
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील महिन्यात व्हीआयपींच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापासूनच पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. यामध्ये अवकाशात ड्रोन कॅमेरा उडणाऱ्यांबाबत नियमावली पोलीस प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे.
त्यामध्ये 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत कोणीही आकाशात ड्रोन उडवायचा नसल्याचे सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अन्य वेळी उडवायचे असल्यास त्यानी देखील त्यांची रीतसर परवानगी घेऊनच हे ड्रोन उडवावेत अशा सूचना प्रत्येक पोलीस स्थानकातून ड्रोन कॅमेरा धारकांना बोलून देण्यात आले असल्याने आता ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्यांवर मर्यादा आल्या आहेत.