खुद्द आदमापुरात बाळुमामांचा ट्रिकसिन नाट्यप्रयोग

Edited by: विनायक गांवस
Published on: August 17, 2024 12:35 PM
views 641  views

सावंतवाडी : सद्‌गुरु श्री बाळूमामा यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमीत्त श्री क्षेत्र आदमापुर येथे उद्या  रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव-सावतवाडा यांचा  रसिकांच्या पसंतीचा दर्जेदार ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग श्री संत सद्‌गुरु देवावतारी 'बाळूमामा' हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

यात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध दशावतार कलावंत नितीन आसयेकर असणार आहेत. तसेच दीप निर्गुण, देवेश कुडव, उदय मोर्ये, बंड्या परब, किरण नाईक, रावजी तारी, गुरू वराडकर, रुपेश माने, भगवान सावळ आदी मंडळी यात पहायला मिळणार आहे. संगीत साथ हार्मोनियम सिध्देश राऊळ, पखवाज प्रकाश मेस्त्री, झांज कुणाल परब करणार असून रंगश्री ट्रिक सीन ग्रुप नेरुर ट्रिक सीन प्रविण लिंगे, सुनील मेस्त्री, गौरेश नेरुरकर सादर करणार आहेत. प्रकाश योजना दिप्तेश केळुसकर,सुरेश सातार्डेकर आबा माणगांवकर यांची असणार आहे.