
देवगड : कणकवली विधानसभा मतदारसंघातून देवगड तालुक्यातील बाळू उर्फ गणेश माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. झिरो बजेट इलेक्शन संकल्पना MH 07 बाळू माने मित्रमंडळ सिंधुदुर्ग सर्व ड्रायव्हर यांनी एकमताने निर्णय घेवून कणकवली विधानसभा मतदारसंघातून सर्वसामान्य जनतेतील गेली 26 वर्ष ड्रायव्हर क्षेत्रातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा गणेश उर्फ बाळू माने यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून 28 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांचे गेले 3 महिने कणकवली देवगड वैभववाडी या मतदार संघांमध्ये गांव दौरे चालू असून सर्वसामान्य जनतेतून झिरो बजेट इलेक्शन संकल्पनेला त्यांना खूप प्रतिसाद लाभत आहे. ह्या गांव दौऱ्याच्या भेटी च्या माध्यमातून त्यांना असे दिसून आले की कोणतेही इलेक्शन लढविण्यासाठी पैशाची गरज नसून योग्य विचारांची गरज आहे.
आपली अनमोल आणि पवित्र लोकशाही लोप पाऊ नये म्हणून MH07 बाळू माने मित्र मंडळ सिंधुदुर्ग यांनी प्रवाहाविरुद्ध लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.