
कणकवली : माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणेशकृपा मित्रमंडळ, कलमठ-लांजेवाडीतर्फे मंगळवार १३ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वा. लांजेवाडी येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेकरिता रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
स्पर्धेच्या माहितीसाठी महेश परब (९४०४१६६१२८), सागर पष्टि, राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.