
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ तालुक्याचे युवकचे अध्यक्ष प्रसाद नार्वेकर यांनी केला आहे. माणगाव, नानेली, घावनळे, पुळास, हळदीचे नेरूर, कालेली, नानेली, शिवापूर आठ ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यपदाचे उमेदवार उभे केले होते. यात 16 ठिकाणी उमेदवार दोन नंबर वर राहिले आहेत. सहा जागा थोडक्यात गेल्या आहेत. तर माणगाव ग्रामपंचायत मध्ये प्रभाग दोन मध्ये सूर्या आडेलकर यांची जागा अवघ्या ६ मतांनी गेली. भविष्यात अनेक पक्षप्रवेश होतील, असाही दावा प्रसाद नार्वेकर यांनी केला आहे. ते माणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.