बाळासाहेब नंद्दीहळ्ळी यांची सिंधुदुर्ग काँग्रेसच्या शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी नियक्ती

Edited by: दिपेश परब
Published on: August 01, 2023 13:11 PM
views 198  views

सिंधुदुर्ग : प्रा.बाळासाहेब नंद्दीहळ्ळी यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सोनावणे यांनी नियुक्तीचे पत्र प्रा.बाळासाहेब नंद्दीहळ्ळी यांना दिले आहे.

 प्रा.बाळासाहेब  नंदीहळ्ळी M. A., B. Ed. माजी प्रा.व उपप्राचार्य राणी पार्वतीदेवी हाय. व ज्युनि. काॅलेज  आणि डाॅ. जे. बी. नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय सावंतवाडी येथे अध्यापन कार्य. 

गेली 35 वर्षे अध्यापनात कार्यरत  असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या भूगोल अभ्यास मंडळ, शिक्षक प्रशिक्षणाचे  विषय तज्ञ, सिंधुदुर्ग जिल्हा  ज्युनियर  काॅलेज शिक्षक संघटनेचे कार्यकारणी सदस्य म्हणून काम केले आहे.निसर्ग पर्यटन माझी संकल्पना, नैसर्गिक संसाधनांचे संधारण जल व्यवस्थापन, पर्यावरण  प्रदूषण, पर्यावरण संवर्धन या विषयावर शोध निबंधाचे लेखन, भारताचा भूगोल, पर्यावरण भूगोल या मार्गदर्शक पुस्तकांचे लेखन केले आहे.

     अशा उच्च शिक्षित आणि गेली 35 वर्षे अध्यापनाचे काम केलेल्या अनुभवी व्यक्तीची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिक्षक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.