बाल शिवाजी स्कूलचं स्नेहसंमेलन उत्साहात !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 23, 2023 17:06 PM
views 327  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 22 डिसेंबर 2023 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. गणपतीच्या चौसष्ठ कला 'कर्मसु कौशलम' या विषयाला अनुसरून विविध कला सादर करण्यात आल्या. यात तराणा, कथ्थक, केरळी नृत्य, आदिवासी नृत्य, नाट्यसंगीत वस्त्रहरण हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. 

एखादा विद्यार्थी विद्या अभ्यासात कमी असेल तर त्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या कलेत तो अतिशय उत्कृष्ट असतो म्हणून विद्यार्थ्यांच्या कलेला रंगमंच हाच सर्वभूत ठरतो. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले, अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर  सुधीर सावंत, संस्थेच्या सचिव सुलेखा राणे,  रमेश राणे, संदीप सावंत, विनायक सापळे,  प्रणाली सावंत, अभिजीत सावंत, अनिष देशमुख, तृप्ती देशमुख,  विवेक राणे, पालक - शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रीती करंबेळकर, सहसचिव ,अरुण राणे, मुख्याध्यापिका  गीतांजली कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग  प्रदीप कुमार कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, थोरात, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीम. अवटी, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, पंचायत समिती कणकवली, जानवली केंद्रप्रमुख पवार सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवराज श्रीमंत लखमराजे यांनी शाळेला शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. शाळेच्या नावातच इतिहास आहे व ऐतिहासिक भारतीय संस्कृतीचा वारसा या शाळेला नावानुसारच प्राप्त झाला आहे. या शाळेतला विद्यार्थी सुसंस्कृत व सुजाण नागरिक म्हणूनच पुढे जाईल असे वक्तव्य त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शाळेत शिवाजी, जिजाऊ शिक्षण घेत आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीतही शाळेने आपला यशाचा पायंडा सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट ठेवला आहे असे मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवराज लखमराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या सचिव सौ सुलेखा राणे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा श्री अभिजीत सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कु. ओवी अकनूरकर (5वी), कु. तनिष्का सावंत (8वी)आणि कु. रितिका खापेकर (8वी) या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप परीक्षेत राज्यस्तरीय प्राविण्य मिळवल्याबद्दल तसेच कु. आर्यन जाधव, कु. मिथिलेश तळदेवकर, यांनी एस.ओ.एफ. फाउंडेशन इंग्लिश ऑलिम्पीयाड परीक्षेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शाळेचे आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. पियुष दळवी आणि कु. प्रणाली ठोंबरे इयत्ता दहावी यांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कुमारी शामली कदम व मधुरा कदम यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी जाधव, सौ. शिल्पा तिवरेकर, प्रेरणा चिंदरकर, मंजुषा जामसंडेकर, संपदा नर, तृप्ती साळवी, जिशिना नायर, अनघा राणे, श्रीपाद बाणे, आनंद मेस्त्री, साबळे, प्रणाली किर्ते, गौरी परब, निलेश काळसेकर, गौरव धामणकर, सुवर्णा राणे, सावंत, मानसी गुरव यांचे अतिशय उत्कृष्ट असे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी मानले.