बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात...!

Edited by:
Published on: June 21, 2023 19:58 PM
views 130  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. 'आदियोगी', योगा, प्राणायाम याबाबत मुलांना प्रशालेचे शिक्षक वैभव खोचरे यांनी माहिती दिली. आनंद मेस्त्री, खोचरे, जिश्ना नायर यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, विविध आसने, प्राणायाम व ध्यान करून घेतले. 

या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका सुलेखा राणे, सदस्य संदीप सावंत, प्रतीक सापळे, मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.