वीर बाजीप्रभूंच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन स्पर्धा !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 14, 2024 06:27 AM
views 149  views

सावंतवाडी : 13 जुलै वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा स्मृतिदिन याच दिवशी घोडखिंडीतला रणसंग्राम घडला आणि घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाली. सिद्धी जौहर या आदिलशाही कडव्या सरदाराने पन्हाळ गडाला वेढा घातला आणि सह्याद्रीचा सिंह शिवाजी महाराज त्यात अडकले गेले. या वेढ्यातुन महाराज सहिसलामत विशाळगडावर पोहोचले ते वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अद्वितीय पराक्रमाने आणि हौतात्म्याने. हा इतिहास घडला तो 13 जुलै 1660 या दिवशी. म्हणूनच बाजीप्रभूच्या स्मृती प्रित्यर्थ शिवसंस्कारने भव्य वीर बाजीप्रभू देशपांडे वेशभूषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

    

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांसाठी ही स्पर्धा ऑनलाईन होणार असून स्पर्धाकांनी दि 31 जुलै पर्यंत आपला दोन मिनिटांचा व्हिडिओ 9607827296 या नंबर वर पाठवावा. एन्ट्री फि रु 100 संस्थेचा कोड स्कॅन करून पाठवावी. वेशभूषा स्पर्धा फक्त लहान गटा साठी आहे वयोगट -पहिला गट - 4 ते 7, दुसरा गट 8 ते 12, वक्तृत्व स्पर्धा गट -खुला गट - यामध्ये कोणत्याही वयाचा स्पर्धक सहभागी होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धेकांनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कारने केले आहे.