अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जामीन मंजुर

Edited by: विनायक गावस
Published on: August 04, 2023 20:19 PM
views 283  views

सावंतवाडी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी याला जामीन मंजुर करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अॅड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वेंगुर्ला येथे घडला होता. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आदित्य अरुण सावंत रा. गवाण परुळे, वेंगुर्ला याने लग्नाचे आमीष दाखवून माळरानावर संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला होता. त्यानंतर आरोपी हा वारंवार फिर्यादी हिला भेटण्यासाठी जबरदस्ती करीत होता. फिर्यादी हिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी याने फिर्यादी हिला देवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न आरोपी हा वारंवार करीत होता. दरम्यान ०८/०८/२०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास संबधित फिर्यादी विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेलेली असता आरोपी हा तेथे जाऊन फिर्यादी हिच्या हातावर धरुन रस्त्याच्या शेजारी असलेल्या खोपीमध्ये न्हेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार घडलेला होता. त्यानुसार फिर्यादी हिने ०९/०८/२०२१ रोजी आरोपी याच्याविरूद्ध तक्रार नोंदविली होती. फिर्यादी हिच्या तक्रारीवरून आरोपी याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३७६, ३७६(१), ३७६ (२) (n), ३५४ (b), ३२३, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (५), ३(२)(५) व माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपी याला अटक करण्यात आलेली होती. आरोपी याच्यातर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर यांनी जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार ओरोस येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी अॅड. निरवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी याला जामीन मंजुर करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, व अॅड. गणेश प्रकाश चव्हाण यांनी काम पाहिले.