सावंतवाडी न.पा.च्या मासळी मार्केटमध्ये दुरवस्था ; राजू मसुरकरांनी वेधलं लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 12:23 PM
views 116  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका मासळी मार्केटमध्ये दुरवस्था झाली आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या समस्येबाबत निवारण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केली आहे.

वृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना मासे मार्केट मधील फरशी फुटल्याने तसेच जिन्यावरच रेलिंग खराब झालेले आहे. तात्पुरते स्वरूपात  लाकडी मानग्याचे रेलिंग लावल्याने अपघात घडू शकतो. याकडे नगरपालिकेचा दुर्लक्ष झालेला आहे यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने ताबडतोब कारवाई व्हावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे