
कणकवली : कुरंगवणे - बेर्ले ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच पार पडली. सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपसरपंच निवडणूकीचा निर्णय घेण्यात आला. उपसरपंचपदी बाबला गणपत गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेली अडीच वर्षे उपसरपंचपदी निवृत्ती श्रीधर पवार होते.त्यांनी एप्रिलमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली.या प्रसंगी ग्रा. पं. सदस्य निवृत्ती पवार, रविंद्र पवार, विशाखा राऊत, अक्षदा सादिकले, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर, ग्रामपंचायत अधीकारी गिरीश धुमाळे आदी उपस्थित होते.