त्याला बबन साळगावकरच जबाबदार !

केसरकरांवर नाहक टीका नको : राजन पोकळे
Edited by: विनायक गांवस
Published on: May 31, 2024 14:12 PM
views 155  views

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे तीन वेळा निवडून आलेल्या बबन साळगावकर यांनी स्वतंत्र्य निवडणूक लढवून आपली इमेज सावंतवाडीकरांना दाखवून दिली आहे. त्यामुळे उगाच वायफळ टीका केसरकर यांच्यावर करणे बंद करावे असा पलटवार माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केला. दरम्यान बबन साळगावकर यांच्या बरोबर आता कोणीही राहिलेलं नाही. आजूबाजूला सडलेले लोक आहेत. त्यांना घेऊन ते नाहक केसरकर यांच्यावर टीका करून आपलं राजकारणात स्थान टीकवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप श्री पोकळे यांनी यावेळी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, आज पर्यंत सावंतवाडी शहरात जीतकी ही विकासकामे झालीत ती केसरकर यांच्यामुळेच झालीत. केसरकारांनी श्रेय घेण्याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळे बबन साळगावकर नाहक केसरकर यांची बदनामी करून सावंतवाडीकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. बबन साळगावकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढून आपली इमेज काय आहे हे त्यांनी दाखवून दिलेल आहे. त्यामुळे कोणीही किती केसरकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी जनता ही सुज्ञ आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला. 

दरम्यान, अंडरग्राउंड वीजवाहिनीचा जो निधी परत गेला याला पूर्णपणे जबाबदार हे बबन साळगावकरच आहेत. त्यामुळे त्यांनी नाहक केसरकर यांच्यावर टीका करणे बंद करावे असे ही ते यावेळी म्हणाले.यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, अनोरोजिन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, स्नेहल कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, आदी यावेळी उपस्थित होते.