बबन साळगावकर यांच सीओंना पत्र

जबाबदारीची करून दिली जाणीव
Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2023 15:33 PM
views 189  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी न.प.चे मुख्याधिकारी यांच शहरातील स्वच्छता, पाणी प्रश्न सुविधांच्या अभावाबाबत निवेदन देत लक्ष वेधल आहे. तसेच प्रशासकीय राजवटीत जनतेला साध्या कामासाठी खेपा माराव्या लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.


सावंतवाडी शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. पाण्याच्या तक्रारीनंतर नगरपरिषद कर्मचारी सुरुवातीच्या टॅबमधून पडत असलेल्या पाण्याचे फोटो काढून पाणी मिळत असल्याचं कारण दाखवतात. परंतु, सत्य परिस्थिती ग्राहकाला पाचशे लिटर ही पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. शहरातील उंच भागामध्ये पाण्याचा प्रचंड अभाव आहे. शहरांमध्ये ठिकठिकाणी मच्छी विक्रेते बसत असून शहराचे विद्रूपीकरण आणि गलिच्छपणा वाढत चालला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत एकसूत्रता नसून शहरांमध्ये ठिकठिकाणी आतल्या पानंदी रस्त्यामध्ये कचरा दिसत आहे. फक्त दर्शनी भागामध्ये झाडलोट सुरू असते प्रत्येक पानंदीमध्ये स्वच्छता होणे आवश्यक आहे. शहरातील ओले गटार स्वच्छ केले जात नसून ते साफ करून तिथे पाणी मारणे आवश्यक आहे. तलावाच्या पाण्याची दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे. तलाव काठाच्या बाजूने असलेला कचरा काढणे आवश्यक आहे. परंतु तिथेही कोणी आज तगायत लक्ष दिले नाही. सार्वजनिक शौचालय अत्यंत गरीब स्थितीमध्ये आहे. इथे रोज स्वच्छता होणे आवश्यक आहे. एसटी स्टँड सुलभ शौचालय अत्यंत गलिच्छ असते याचं इन्स्पेक्शन होण आवश्यक आहे. शहरात रस्त्यावरती ठिक ठिकाणी खडी वाळू अस्तव्यस्त पडलेली असते इथेही दुर्लक्ष आहे. कार्यालयीन कामकाजा येथे अनियमित असून येथे नागरिकांना साध्या साध्या दाखल्यासाठी रजिस्टेशनसाठी अनेक वेळा खेपा माराव्या लागतात ही बाब गंभीर आहे. स्थानिक नागरिकांना साध्या साध्या गोष्टीसाठी नगरपरिषदेमध्ये पुन्हा पुन्हा येरजारा घालावे लागतात याचा अर्थ आपला प्रशासनावरती लक्ष नाही असा होतो. सर्वच खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनातील अनियमित कर्मचाऱ्यातील समन्वय अभाव आपण साधून द्यावा काही कर्मचाऱ्यांचा अरेरावी पण वाढत असेल त्याचा नागरिकांचा त्रास होतोय अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त आहेत.


सावंतवाडी शहराची ओळख पर्यटननगरी अशी आहे. इथे अनेक पर्यटक या शहराला भेट द्यायला येतात प्रशासकीय काळामध्ये इथे दुर्लक्ष होत आहे. वरील सर्वबाबींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनामध्ये सुसुत्रता आणावी तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरती लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न कार्यालयीन कामकाजाचा प्रश्न जातीने लक्ष देऊन दूर करावा अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली आहे.