बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रेची आज होणार सांगता !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 03, 2024 12:24 PM
views 70  views

देवगड : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबांचा स्मृतीदिन ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापर्यंत बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रा सुरु केली . या यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये विविध शाळा . विद्यालये व गावा मध्ये जादूटोणा विरोधी कायदाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते . याचा शेवटचा कार्यक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्ताने ३ जानेवारीला कोळोशी हडपीड विद्यालय देवगड येथे सकाळी १० वा . आयोजित केला आहे  व बौद्धवाडी असलदे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दुपारी एक वाजता प्रबोधनाचा कार्यक्रम जिल्हा संघटक विजय चौकेकर हे करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी समिती सदस्यांनी व सजग नागरिकांनी उपस्थित रहावे असे अभाअंनि समिती सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.