आंबोलीतील बाहुबली धबधबा होतोय उद्या खुला

शिक्षणमंत्री दिपक केसरकरांच्या पाठपुराव्याला यश
Edited by: संदीप देसाई
Published on: August 11, 2023 20:13 PM
views 1076  views

amboli : आंबोली येथील बाहुबली धबधब्याचे उद्घाटन उद्या शनिवारी (दि.१२) रोजी पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते होणार उद्घाटन. आंबोली पर्यटन वाढावे यासाठी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार ना. दिपक केसरकर सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने हा धबधबा आता सर्वांसाठी खुला करण्यात येणार असून आंबोलीच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांसाठी बहरते पर्यटन महत्वपूर्ण असल्याने, या वर्गाकडून ना. केसरकरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.