बी. फार्मसीत इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2024 12:39 PM
views 200  views

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या बी. फार्मसी अंतिम सेमीस्टर ८ चा निकाल लागला असून या परीक्षेमध्ये इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, रत्नागिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाचा बी. फार्मसीचा एकूण निकाल  ८७.८६ टक्के लागला. तर महाविद्यालयाचा एकूण निकाल हा ९८.३१ टक्के लागला आहे. 

आकांक्षा धोत्रे हिने ८.५५ सीजीपीए मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर द्वितीय क्रमांक कु. प्रतीक वाडेकर ( ८.४६), तृतीय क्रमांक कु. वफा नेवरेकर, कु. सिद्धी पाडळकर, कु. अनोमा जाधव (८.३७), चतुर्थ क्रमांक कु. प्रेरणा कळंबटे (८.२८), पाचवा क्रमांक कु. नेहा धुळप, कु. दीपक खेडेकर, कु. सिद्धी सावर्डेकर, कु. सानिका नरवणकर (८.१९). तसेच नायपर जेईई २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा देखील निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील विदयार्थीनी आकांक्षा धोत्रे हिने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून ५१९ ऑल इंडिया रँकिंग पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राप्त केली आहे. विद्यार्थांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. अमोल खाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.