"अयोध्या" महानाट्याला वेंगुर्ल्यात तुफान प्रतिसाद

Edited by: दिपेश परब
Published on: January 15, 2024 14:19 PM
views 307  views

वेंगुर्ले :  राम म्हणजे मंगलमय ,पवित्र्याचे , सद्गुणांचे , समर्पणाचे वातावरण . प्रभू रामचंद्रानी जे आदर्श प्रस्थापित केले त्या मार्गांवर आपण चाललो तर खऱ्या अर्थाने आपण रामराज्याचे पाईक ठरू असे प्रतिपादन कोकण राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे सहसंचालक अर्जुन उर्फ बाबा चांदेकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केले.

सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आज  (15 जाने). रोजी अयोध्या या महानाट्याचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,माजी आमदार राजन तेली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू महाडेश्वर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ , माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप , युवा नेते भाई सावंत ,वारकरी संप्रदायाचे कुर्ले बुवा, भागवत प्रबोधिनीचे संजय पुनाळेकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , निर्माते प्रणय तेली , भाजपा  तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.


 यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे परिवर्तन पहायला मिळत असून नवीन पर्व सुरु होत आहे,असे विचार व्यक्त केले. प्रणय तेली यांनी अयोध्या महा नाट्याबाबत रूपरेषा स्पष्ट करत या महानाट्यासाठी बहुमूल्य सहकार्य करणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी माजी आमदार राजन तेली , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही विचार व्यक्त केले. 

 यावेळी कारसेवक श्री. बागलकर , गजानन दामले यांचा योगदानाबद्दल शाल , श्रीफळ व राममंदिर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रसन्ना देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मयूर खानोलकर , स्वागत प्रसन्ना देसाई , सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत हा पहिला शुभारंभाचा प्रयोग मोफत ठेवण्यात आला होता. याला श्री राम भक्तांसहित नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.