झोळंबेत पाणलोट यात्रेनिमित्त जनजागृती फेरी

Edited by: लवू परब
Published on: January 23, 2025 21:00 PM
views 103  views

सावंतवाडी : शासनाची पाणलोट यात्रा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. झोळंबे येथे पाणलोट यात्रेनिमित्त जनजागृती फेरी काढली तसेच गावातील सात वाडीतून एक कलशातून पाणी व माती एकत्र आणून उपसरपंचाच्या उपस्थित जलपूजन करण्यात आले.

यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणलोट यात्रा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून सुरू होणार आहे. या यात्रेनिमित्त गावागावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. झोळंबे येथे या यात्रेनिमित्त जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रकल्प समन्वयक नितीन सावंत यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच लवकरच रथयात्रा येत असून त्याची माहिती ही देण्यात आली.

तसेच पाणलोट यात्रा जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली व जल व मृद् संवर्धन यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गावातील 7 वाडीतून  एक कलाशातून पाणी आणि माती आणून ते एकत्र करत जल व मृद पूजन करण्यात आले उपसरपंच यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पाणी हेच जीवन यावर मुलांनी उत्कृष्ट वक्तृत्व कथन केले तसेच  विद्यार्थ्याची चित्रकला, निबंध, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये तलाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सहभागी होत मार्गदर्शन केले. गावातील महिलांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला. पाणलोट योद्धा म्हणून सर्वानुमते पाणलोट समिती सचिव प्रकाश गवस यांचे नाव घोषित करण्यात आले.

या पाणलोट यात्रेत पाणलोट समिती सर्व सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी पोस्टमास्तर, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह,बचत गट महिला,शेतकरी गट सदस्य आदी सहभागी झाले होते.