
सावंतवाडी : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान कणकवलीतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांना सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. डॉ. पाटकर यांच्या 'अर्जमधील दिवस' या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात आला. सिंधु वैभव साहित्य समूहाचा मधुसूदन नानिवडेकर पुरस्कार मिळालेल्या कवयित्री अंजली मुतालिक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
तसेच डॉ. संजीव लिंगवत, कोकणसाद LIVE च्या संपादिका देवयानी वरसकर अन्यायरहित जिंदगीचे अरुण पांडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.