
कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल' ला शनिवारी 28 डिसेंबर रोजी सायंकाळी कुडाळ हायस्कूल मैदानावर शानदार सुरुवात झाली ३१ डिसेंबर पर्यत हा महोत्सव असून सिंधुदुर्गसह मुंबई पुणे कोल्हापूर आदी भागातून सुमारे ९० इंडस्ट्रियल, ऑटो एक्सपो, खाद्यपदार्थ व जनरल स्टॉल्स सहभागी झाले आहेत
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला सुरवात झाली निखळ मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमाने नटलेल्या महोत्सवाचे, उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रथम उप प्रांतपाल लायन. विरेंद्र चिखले लायन सीए, सुनील सौदागर उपाध्यक्ष कोकण रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर श्रीकृष्ण परब उपाध्यक्ष वेस्टर्न रिजन महाराष्ट्र रमाकांत मालू, का. आ. सामंत, लक्ष्मी ज्वेलर्सचें राहुल पाटणकर, अरविंद शिरसाट एम आय डी सी असोसिएशन अध्यक्ष मोहन होडावडेकर लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर अँड अजित भणगे, अँड श्रीनिवास नाईक आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली,डॉ संजय सावंत प्रकाश नेरुरकर शशी चव्हाण डॉ विवेक पाटणकर,मंदार शिरसाट डॉ दीपाली काजरेकर देविका बांदेकर अँड राजीव कुडाळकर, दत्ताराम राजेंद्र राणे, नकुल पार्सेकर, अनंत शिंदे, नयन भणगे, स्नेहा नाईक, ऍड. समीर कुळकर्णी, डॉ, सुशांता कुळकर्णी, डॉ. जयंती कुळकर्णी, शोभा माने, चेतना चुबे, रश्मी चव्हाण, अस्मिता बांदेकर, मेघा सुकी, अँड शेखर वैद्य, डॉ. अमोघ चुबे,अँड. मिहीर भणगे, जीवन बांदेकर, शैलेश मुंडये, साईश सामंत कपिल शिरसाट राजन कोरगावकर मंजुनाथ फडके मनोज मठकर नितीन दळवी लायन्स, रोटरी क्लबचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
सदरच्या महोत्सवामध्ये सर्व नामांकित ऑटोकंपन्यांच्या गाड्यांच्या वितरकांचे स्टॉल अनुभवण्यास मिळतील व हे ह्या वर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. महोत्सवामध्ये इंडस्ट्रियल व जनरल स्टॉल्स साठी राज्यभरातून विविध प्रकारचे (हर्बल, आयुर्वेदिक, कॉसमेटिक प्रोडक्ट्स, शेती-घरगुती यंत्र इ.) स्टॉल्स अनुभवण्यास मिळणार आहेत. या सर्वांसोबतच खवय्यांसाठी मेजवानी म्हणून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील आहेत . फूड-स्टॉल्समध्ये विशेष आकर्षणाचे रुचकर चविष्ट पदार्थ, मराठमोळ्या खाद्य संस्कृतीने भरलेल्या चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळणार आहेत.