
दोडामार्ग : दोडामार्ग विकास सेवा सो. लि., दोडामार्ग या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या रोजगारनिर्मिती उपक्रमाअंतर्गत ऑटो रिक्षा वितरण कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास दोडामार्ग च्या सहाय्यक निबंधक पल्लवी पई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सूचन कोरगावकर, उपाध्यक्ष अनिल सांबारी, संचालक मंडळाचे सदस्य पांडुरंग बोर्डेकर, साबाजी मोरजकर, विलास आसोलकर, आनंद म्हाडगुत, नितीन पालकर, दिलीप मयेकर, नाना बोर्डेकर, सुरेश जाधव, रेश्मा कोरगावकर, मनीषा चव्हाण, संदीप गवस, ओंकार फाटक तसेच कर्मचारी आश्विनी सावंत, स्वरा नाईक, पिग्मी एजंट गुरुप्रसाद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संस्थेने यापूर्वीच विविध बचत योजना, पिग्मी व आर.डी. योजनांद्वारे स्वफंड उभारून सदस्यांना आर्थिक स्थैर्याचा आधार दिला आहे. त्याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ऑटो रिक्षा वितरण करून स्थानिक युवकांसाठी रोजगाराचा नवा मार्ग खुला करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष सूचन कोरगावकर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून पुढेही असेच उपक्रम सातत्याने राबवले जातील.” दोडामार्ग मधील अन्य रोजगार निर्माण करू इच्छिणाऱ्या युवक, शेतकरी व व्यावसायिक यांना ही भविष्यात सोसायटीच्या माध्यमातुन अर्थपूरवठा करण्याची ग्वाही दिली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा नाईक यांनी केले, तर आभार आश्विनी सावंत यांनी मानले.










