स्वर्गीय गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवात ऑस्ट्रेलियन पाहुण्यांचा युवकांशी संवाद

भारतीय नात्यांमधलं प्रेम भारावून टाकणारे : ऑलिव्हर मर्चंड
Edited by:
Published on: January 19, 2025 19:09 PM
views 264  views

सावर्डे : भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसाच तो भावना प्रधानही आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आत्मिक बल वाढवण्याचे काम फक्त भारतीय संस्कृतीतच आढळते. हे मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे. भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे हे ऐकले होते ते प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहायला मिळाले, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियन पाहुणे ऑलिवर मर्चंड यांनी केले.  ते स्व.गोविंदरावजी निकम यांच्या ९० व्या जयंती महोत्सवात विद्यार्थी सन्मान सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यांनी इंग्रजीतून केलेला हा संवाद संस्थेतील तुषार बिजीतकर यांनी मराठीत भाषांतर करून विद्यार्थ्यांसमोर मांडला.

ते पुढे म्हणाले , भारत या देशात जयंती, पुण्यतिथी साजरी करतात आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात ही नाविन्यता मी पहिल्यांदा पाहतोय आणि याचा मला आनंद आहे. कृषी क्षेत्रात काम करताना 65 हजार हेक्टर मध्ये विविध फळांची लागवड करून अतिशय चांगले काम करण्याचा आमच्या देशांमध्ये मी प्रयत्न करतोय. मात्र भारत देशाचे वातावरण हे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने आणि पिकांच्या साठी अतिशय उपयुक्त आहे. येथील तरुणांनी व्यवसायामध्ये पदार्पण करून जास्तीत जास्त विकास साधावा असे आवाहन ऑस्ट्रेलियन पाहुणे  यांनी याप्रसंगी युवकांना केले.

ऑलिव्हर मर्चंड यांनी आपले अनुभव याप्रसंगी युवकांच्या समोर कथन केले. हे अनुभव भारतीय युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. यावेळी मंचावर आमदार व संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संचालक शांताराम खानविलकर मानसिंग महाडिक संस्थेचे पदाधिकारी सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रदीप निकम,प्रशांत निकम, सह्याद्रीचे क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम पालक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ त्याच बरोबर क्रीडा शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रशियन पाहुणे ऑलिवर मर्चंड यांचेविषयी 

५ व्या वर्षी मोटोक्रोस,१६ व्या वर्षा टोकास शर्यतीची सुरुवात करणारे, NSW राज्याच्या अंतर्गत १६ श्रेणीत टॉप तीनमध्ये स्थान मिळवून यश प्राप्त करणारे,ऑस्ट्रेलियाभर स्पर्धा करत 40,000 किमी वार्षिक प्रवास करून ऑस्ट्रेलियातील टॉप १० मोटोक्रोस रेसर्समध्ये सातत्याने स्थान मिळवून,कृषीव्यवसायातील डिप्लोमा पूर्ण करून ते कीन्सलँड विद्यापीठातून कृषी आणि कृषीव्यवासाय पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत.ऑस्ट्रेलिया येथील कौटुंबिक व्यवसायातील करार व्यवस्थापनात सक्रीय सहभाग व 65000 हेक्टरवर यंत्रसामग्री ऑपरेशन्सची देखरेख करून त्याचवेळी विविध पिकांची लागवड करून  300 हेक्टर शेतीचे व्यवस्थापन करणारे  ए. जी. मर्चंड सर्व्हिसेस न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाचे सहसंचालक