अतुल रावराणे यांनी घेतली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट | पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण करण्याची केली मागणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 02, 2023 19:47 PM
views 155  views

वैभववाडी : गेली अनेक वर्षे वापराविना पडून राहीलेल्या पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली.मुंबईत श्री . रावराणे यांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली.यावेळी त्यांना निवेदन दिले.

दोन दिवसांपूर्वी पंचायत समिती इमारतीची अतुल रावराणे यांनी पाहणी केली होती.सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून पंचायत समितीची इमारत उभारण्यात आली आहे.मात्र ही इमारत वापराविना गेली कित्येक वर्षे पडून आहे.याबाबत श्री रावराणे यांनी चव्हाण यांची भेट घेऊन ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.मात्र केवळ फर्निचर व संरक्षण भिंतीसाठी निधी मिळाला नसल्याने लोकार्पण रखडले आहे.मात्र या दोन्ही कामांचं अंदाजपत्रक  जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून वाढीव केले आहे.या अधिका-यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी श्री रावराणे यांनी केली आहे.तसेच सध्या आवश्यक असलेल्या फर्निचरसाठी २५ लाख रुपये इतका निधी लागणार आहे.तो तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.याला मंत्री चव्हाण यांनी सकारात्मक दर्शवली आहे.