वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अतुल रावराणे यांनी बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. भगवा सप्ताह च्या निमित्ताने जिल्हा परिषदनिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैभववाडीतील लोरे, कणकवली तालुक्यातील कळसुली जि.प.मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. रावराणे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. लोकसभेतील पराभवाने खचून जाऊ नका. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. आपण या मतदारसंघात विजय मिळवू शकतो असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.