
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने सागरी सीमा मंच आयोजित सागरी सीमा सुरक्षा या परिसंवादाचे आयोजन भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे करण्यातआले होते. स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर यांनी यावेळी सागरी सीमा सुरक्षा या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विचार मांडले.यावेळी कमांडर राजीव कुबल, वरिष्ठ सेवा निवृत्त पोलिस अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक सागरी सुरक्षा सचिन हुंदळेकर, प्रांत संघटन मंत्री. सागरी सुरक्षा अनिकेत कोंडाजी, रविकिरण तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.