
पणजी : पश्चिम विभागीय परिषदेस गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावं यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माननीय केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीला उपस्थिती लावली.
या बैठकीत प्रादेशिक विकास आणि सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातील प्रमुख विकासात्मक प्राधान्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना गोव्याने राबविलेल्या सर्वोत्तम पद्धती, राज्याचे यशस्वी घनकचरा व्यवस्थापन मॉडेल सादर करणे, त्याचे परिणाम अधोरेखित करणे आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनातील भविष्यातील प्रगतीसाठी रोडमॅपची रूपरेषा मांडण्याची संधीही मिळाली.