राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न

Edited by: विनायक गावस
Published on: May 22, 2023 19:23 PM
views 96  views

        केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. अगेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेत या कारवाईचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी आपली भुमिका मांडली. याप्रसंगी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब,  प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पिळणकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला निरीक्षक दर्शना बाबर‌ देसाई, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष नजीर शेख, हिदायतुल्ला खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.