धक्कादायक प्रकार ; शाळेतील मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न

आरडाओरड केल्यान मुलांना वाटेत सोडून कीडनॅॅपर पसार
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 13, 2023 13:24 PM
views 5362  views

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावामध्ये प्राथमिक शाळेतीत 3 ते 6 पर्यंतच्या 6 मुलांना अनोळखी इसमांकडून किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सावडाव माजी सरपंच दत्तात्रय काटे व शिक्षकांकडून देण्यात आली. एका चार चाकी गाडीमध्ये मुलांना जबरदस्तीने बसवून त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मुलांनी आरडाओरडा केली असता त्यांना वाटेतच सोडून ती चार चाकी गाडी व त्यातील व्यक्ती हे पसार झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्यामुळे सावडाव शाळेत शिकणारी ही मुलं व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.