BIG BREAKING | भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 19, 2022 11:12 AM
views 712  views

रत्नागिरी : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी घरासमोर पेट्रोल बाटलीही टाकण्यात आली. भास्कर जाधव यांच्या पाग येथील घरासमोरील अंगणात क्रिकेटमधील स्टंप, पेट्रोलच्या बॉटल्स व दगडी आढळल्याने खळबळ उडाली आहे. आमदार जाधव यांनी काल कुडाळ येथे भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यावर कडवी टीका केली होती. याचेच हे पडसाद नाहीत ना असा सवालही उपस्थित होत आहे.