संगमेश्वर तालुका कुंभार प्रीमियर लीगमध्ये अथर्व स्पोर्ट्स माखजन विजेता

Edited by:
Published on: January 20, 2025 13:12 PM
views 161  views

संगमेश्वर : संगमेश्वर तालुका कुंभार समाज व युवा आघाडी आयोजित संत गोरा कुंभार चषक कुंभार प्रीमियर लीग (KPL) पाटगाव देवरूख येथे संपन्न झाल्या . यामध्ये अथर्व स्पोर्ट्स माखजन यानी प्रथम क्रमांक पटकावला यांना रोख रक्कम 15001 व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये श्री गणेश स्पोर्ट्स पाटगाव कुंभारवाडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला यांना रोख रक्कम 11001 व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

तृतीय पारितोषिक अजिंक्य ११ कडवई यांनी पटकावले यांना चषक  देऊन सन्मानित करण्यात आले चतुर्थ क्रमांक कुंभार टायगर्स कसबा यांनी पटकावले यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेतील अंतिम सामन्यांमध्ये प्रथमेश साळवी याला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सौरभ साळवी , उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गजानन साळवी, उत्कृष्ट फलंदाज म्हणून संकेत करंजेकर, मालिकावीर म्हणून तुषार साळवी निवड करण्यात आली.

या स्पर्धेसाठी कोकण विभागीय कार्याध्यक्ष माननीय महेश सायकर, कुंभार समाज जिल्हाध्यक्ष मा. सुभाष गुडेकर जिल्हा सचिव प्रकाश साळवी जिल्हा उपाध्यक्ष सुनील साळवी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष महेश पडवेकर तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य युवा आघाडी पदाधिकारी या सर्व मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संगमेश्वर तालुका युवा आघाडी अध्यक्ष प्रथमेश साळवी, कार्याध्यक्ष सचिन कोलतसकर, उपाध्यक्ष सुरज कुंभार सचिव प्रणय कुंभार ,खजिनदार गणेश साळवी ,जिल्हा युवा जिल्हा खजिनदार प्रतीक साळवी, निलेश तुळसणकर, तुषार साळवी नितेश गवंडी, अनिकेत साळवी यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धा निलेश कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.