विद्या विहार इंग्लिश स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व वेशभूषा स्पर्धा थाटात संपन्न !

आरोस परिवर्तन युवक मंडळ आणि विद्याविहार इंग्लिश स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शिवविचार सोहळा' उपक्रम
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 21, 2023 11:31 AM
views 259  views

सावंतवाडी : रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आरोस परिवर्तन युवक मंडळ आणि विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "शिवविचार सोहळा" कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सावंतवाडी तालुक्यातील आरोस केंद्रातील शाळा मर्यादित स्पर्धेला स्पर्धेचे पहिलेच वर्ष असतानाही उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 

वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी श्री.सोनावळे, प्रमुख पाहुणे मनसेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख महेश परब, शालेय समिती अध्यक्ष गजानन परब, परीक्षक कवी दीपक पटेकर, प्रा. मिलिंद कासार, सामाजिक कार्यकर्ते श्री. पवार, आरोस परिवर्तन युवक मंडळाचे निखिल नाईक, प्रवीण मांजरेकर, तन्वी परब, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, श्री. देऊलकर सर, श्री.सावंत सर, श्रीमती गोडकर, प्रतीक पाटील आदी शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

 प्रशालेचे मुख्याध्यापक धुपकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि आपल्या स्वागत पर भाषणातून कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश व शिवविचार मांडले. प्रमुख पाहुणे महेश परब व शालेय समिती अध्यक्ष गजानन परब यांनी देखील शिवजयंतीच्या निमित्ताने आपले विचार मांडले. वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा याबाबतचे नियम  विषय, कालावधी वगैरे बाबतची माहिती परीक्षक दीपक पटेकर यांनी देत स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.

 विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आयोजित स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. पहिला गट पहिली ते चौथी दुसरा गट पाचवी ते सातवी व तिसरा गट आठवी ते दहावी अशी विभागणी करण्यात आली होती. १ली ते ४ थी या गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व स्वराज्याची स्थापना', ५ वी ते ७ वी गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती व सैन्य व्यवस्था', तर ८ वी ते १० वी गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार व प्रशासन' हे विषय देण्यात आले होते. सर्वप्रथम वेशभूषा स्पर्धा पार पडली. वेशभूषा स्पर्धेनंतर वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये अगदी पहिलीपासून दहावीपर्यंतच्या मुलांनी उत्कृष्ट हावभाव दाखवून अतिशय उत्तम प्रकारे प्रत्येक गटाच्या विषयाला अनुसरून सादरीकरण केले.

वेशभूषा स्पर्धेत पहिली ते चौथी गटात 

प्रथम - सान्वी रूपेश मोरजकर, द्वितीय- विरा समीर परब, तृतीय- वैदेही हेमंत कामत.

पाचवी ते सातवी गटात प्रथम- पूर्वा रघुनाथ परब, द्वितीय- तन्वी प्रमोद परब, तृतीय-आर्या नितेश नाईक

आठवी ते दहावी गटात प्रथम - दत्ताराम सुभाष मोरजकर, द्वितीय - श्वेता सुरेश मडुरकर.

वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथी -

प्रथम - विरा समीर परब, द्वितीय - प्रणय उमेश गवस, तृतीय- पूर्वी महेश्वर कळंगुटकर.

पाचवी ते सातवीच्या गटात -

प्रथम - तनुष्का हरीदास मेस्त्री, द्वितीय - अश्मि संतोष पिंगुळकर, तृतीय - निधी गणेशप्रसाद भट.

आठवी ते दहावी गटात -

 प्रथम - श्वेता सुरेश मडुरकर, द्वितीय- जान्हवी शैलेश शिरोडकर असे स्पर्धक विजयी झाले.

सावंतवाडीच्या कु. अस्मी प्रवीण मांजरेकर हिने सदिच्छापर शिवविचार व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडी येथील लेखक कवी दीपक पटेकर व आरपीडी ज्युनिअर कॉलेजचे प्रा. मिलिंद कासार यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आरोस परिवर्तन युवक मंडळाचे निखिल नाईक यांनी विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आदींचे आभार मानले आणि मुलांना शुभेच्छा दिल्या.

 परीक्षक प्रा. मिलिंद कासार यांनी देखील वेशभूषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेत बाबत मुलांना उत्तम असे मार्गदर्शन केले.

विजेत्या सर्व मुलांना प्रथम क्रमांकासाठी ३०१/- सन्मानपत्र व स्मृती चषक, द्वितीय क्रमांकसाठी २०१/- रु. सन्मानपत्र व स्मृती चषक, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकसाठी १०२/- रु. सन्मानपत्र व स्मृती चषक अशी पारितोषिके देउन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री. देऊलकर सर तर आभार प्रदर्शन श्रीमती गोडकर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी आयोजन विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि आरोस परिवर्तन युवक मंडळाने केले होते.