शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास खा. राऊतांनी दिली भेट...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2024 14:50 PM
views 320  views

सावंतवाडी : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन अर्चना फाऊंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. खासदार विनायक राऊत यांनी या प्रदर्शनास भेट दिली. राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी खासदारांच याप्रसंगी स्वागत केले.

यावेळी शिवकाळातील विविध अभिनव आणि कल्पक शस्त्रे पाहिली तसेच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक देखील पाहिली. सतत मोबाईल आणि व्हिडीओ गेम्समध्ये व्यस्त राहणाऱ्या हल्लीच्या पिढीला शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करून दिल्याबद्दल त्यांनी अर्चना फाउंडेशनचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी बाळा गावडे, शैलेश परब, मायकल डिसोजा, रूपेश राऊळ, चंद्रकांत कासार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, सायली दुभाषी, विवेक गवस, सावली पाटकर व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.