
कणकवली:सावंतवाडी वरून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना सकाळी दहाच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पद टेम्पो दिसून आला त्याला थांबून कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावेळी गाडीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गोवा बनावटीचा मोठा दारू साठा आढळून आला आहे. गाडी ताबडतोब महामार्ग पोलिसांनी कणकवली स्थानकात आणून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे
महामार्ग पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुमित चव्हाण पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली यावेळी पोलीस नाईक केलीस डिसूजा, देवेंद्र जाधव हे देखील उपस्थित होते या टेम्पोमध्ये आत मध्ये कप्पे करून तब्बल 56 बॉक्स आणि 29 बॉटल या गोवा बनावटीच्या दारूच्या असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांनी दिली.