पालकमंत्र्यांचा तरी मान ठेवायचा..!

हतबल विक्रेत्यांची भावना भाजपची 'छत्री' पडली महाग !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 08, 2024 09:25 AM
views 1456  views

सावंतवाडी :  बाजारपेठेत आंबा व फळे विक्रीस बसणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने अखेर नगरपालिका प्रशासनाने हटविण्यास सुरुवात केली आहे. भाजप युवा नेते विशाल परब यांनी नुकतच या विक्रेत्यांना छत्र्यांच वाटप केल होत. यावेळी वटपौर्णिमे पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी त्यांनी विशाल परब यांना केली होती. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच लक्ष वेधण्याची विनंती त्यांना विक्रेत्यांना केली होती. दरम्यान, दोनच दिवसात ही कारवाई झाल्यानं हतबल विक्रेत्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. निदान पालकमंत्र्यांचा तरी मान राखायला हवा होता अशी भावना व्यक्त केली. तर काहींनी भाजपची 'छत्री' महागात पडल्याची प्रतिक्रिया दिली.

दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजपच्या नेत्यांचे फोटो असणाऱ्या छत्र्यांच वाटप करण्यात छोट्या विक्रेत्यांना करण्यात आले होते. यावेळी वटपौर्णिमे पर्यंत इथे बसण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विशाल परब यांना विक्रेत्यांनी केली होती. विशाल परब यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत वटपौर्णिमेपर्यंत विक्रेत्यांना बसण्यास मुबा द्या अशी मागणी केली होती. पालकमंत्री यांच लक्ष वेधाव असं विक्रेत्यांनी विशाल परब यांना सांगितले होतं. 

दरम्यान, दोन दिवसांतच ही दुकाने हटविण्यात आली. नगरपरिषद प्रशासनाकडून निदान पालकमंत्र्यांचा तरी मान राखायला हवा होता अशी भावना हतबल विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली. तर आम्ही दिवसाला ५० रूपये भाड देतो. आंब्याचा सिझन संपत आला असून वटपौर्णिमेपर्यंत आम्हाला इथे बसण्यास मुदतवाढ द्यावी अशी विनंती त्यांनी केली. तर काही विक्रेत्यांनी भाजपची छत्री महागात पडली अशी भावना व्यक्त केली.

मनसे स्टाईल दाखवावी लागेल !

नगरपालिका प्रशासन आणि स्थानिकांवर केलेली कारवाई अन्यायकारक असून त्याची परतफेड आम्ही व्याजासहीत करणार असा इशारा मनसेचे अँड. राजू कासकर यांनी दिला आहे. वटपौर्णिमेपर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांना बाहेर बसण्याची मुभा नगरपालिका प्रशासनाने देण्यात यावी. अन्यथा येत्या काळात आम्ही नगरपालिकेला मनसे स्टाईलने  धडक देऊन विविध प्रश्नांवर जाब विचारू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.