
कणकवली : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली शहरातील केटी बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक, वागदे सरपंच संदीप सावंत, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, बंडू गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
येत्या 2 दिवसांत कनकनगर येथील बंधाऱ्यावर सुदधा लोखंडी प्लेट टाकण्यात येणार आहेत. यामुळे कणकवली शहरासह लगतच्या वागदे, हळवल गावातील संभाव्य पाणीटंचाई रोखली जाणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेत कणकवली वागदे दरम्यानच्या केटी बंधारा आणि कणकवली शहरातील कनकनगर येथील बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवावे अशी मागणी केली होती.
नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यकारी अभियंता (ल.पा.) यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार आजपासून मराठा मंडळ नजीक केटी बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट टाकण्यास सुरवात करण्यात आली आहे. याबाबत कणकवली शहरवासीय, वागदे, हळवल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.