
कुडाळ : जिल्हा न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री संतोष चव्हाण यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे दाखल केले असता जिल्हा रुग्णालयाचे डॉ. श्याम पाटील यांनी मृत घोषित केले आहे. ते पणदूर मयेकर वाडी येथे वास्तव्यास होते. जिल्हा न्यायालयात त्यांनी पाच महिन्या पूर्वी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.