
सिंधुदुर्गनगरी : भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग आयोजित बांदा ता. सावंतवाडी येथील बांदा बाजारपेठ विस्तार केंद्रात सहाय्यक ड्रेस मेकर प्रशिक्षणचे उदघाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
दिनांक १3 ऑगस्ट २०२५ रोजी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी श्री सुधीर पालव संचालक, जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग,गणेश परब सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ,सौ. रेश्मा सावंत, सदस्या, ग्रामपंचायत बांदा, सुवर्णलता धारगळकर, सदस्या, ग्रामपंचायत बांदा रश्मी पेडणेकर, प्रशिक्षक, जन शिक्षण संस्थान तसेच 20 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जन शिक्षण संस्थानचा श्रमिक विद्यापीठ पासूनचा प्रवास . हा प्रवास/ कौशल्य भारतातील शहरी भागापासून ग्रामीण भागात पोहोचविणारे महत्वाचे दुवा ठरणारे त्यावेळेचे राजापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. श्री सुरेशजी प्रभू होते. श्री सुरेशजी प्रभू मुळेच आताही पूर्ण देशात प्रशिक्षणे सुरु आहेत. जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग ने मागील २५ वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यत ३० ते ३५ प्रकारची प्रशिक्षणे ७६ हजार लाभार्थ्यांना दिली आहेत. प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. शिवणकला प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्र मिळावा . तसेच व्यवसाय करण्यासाठी आवश्यक माहिती उदा.उद्यम रजिस्ट्रेशन, कर्ज योजना याबाबत श्री सुधीर पालव यांनी प्रशिक्षानार्थ्याना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे JSS चे सहा. कार्यक्रम अधिकारी यांनी सुरु होणार्या प्रशिक्षणाची माहिती लाभाथ्याना दिली.