आंबोलीतील दत्ताराम कर्पे यांच्यावर प्राणघातक हल्ला !

जागेच्या वादावरून घडला प्रकार
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 06, 2023 13:00 PM
views 364  views

आंबोली : दत्ताराम रामचंद्र कर्पे (वय 40 रा.आंबोली बाजारवाडी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग) यांच्यावर डोक्यावर दगड घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या जबर मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ह्या प्रकरणात ३०७ कलम लावण्यास पोलीसांनी नकार दिला असून पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर ज्यांच्यावर हल्ला झाले ते कर्पे कुटुंबातील लोक व त्यांचे भाचे स्वरूप वाळके यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या ठोकला आहे. तर चौकशी करून अन्य गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, आंबोली बाजारवाडी' येथे कर्पे कुटुंबियांच्या मालकीचा मांगर आहे. त्यांचे आंबोलीत घर आहे. सकाळी 11.30 वा.च्या मानाने मौजे आंबोली बाजारवाडी येथील ग्रामपंचायत घर क्र.1707 जवळील त्यांच्या वहीवाटीच्या जागेत ते व त्यांचा मामेभावाचा मुलगा मयुरेश मनोज पारकर (वय 12 वर्ष) पुतण्या तनुश पांडुरंग कर्पे (वय 4 वर्षे) आई श्रीमती सुवर्णलता रामचंद्र कर्पे, (वय 74) उरे, वहीणी प्रतिक्षा पांडुरंग कर्पे यांच्यासह गेले होते. त्यावेळी तेथे आंबोली बाजारवाडी येथील विनोद विजय जाधव, विजय कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव हे मांगरापाठीमागे चिरे घेवुन बांधकाम करीत होते.

त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्याचा त्यांना राग येवुन विजय कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव,विनोद विजय जाधव यांनी कर्पे यांना पुन्हा या जमीन जागेत आलास तर तुला कायमचा संपविणार, अशी धमकी देवुन शिवीगाळ करीत धक्का बुक्की केली. विनोद विजय जाधव याने तेथे पडलेला दगड हातात धरुन डोक्यावर मारला. तसेच आपली वयोवृध्द आई श्रीमती सुवर्णलता व बहीणी प्रतिक्षा यांच्या अंगावर धावत जावुन त्यांना अश्‍लिल शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली. त्याचवेळी विजय कृष्णा जाधव यांची पत्नी विदया विजय जाधव हिने त्यांच्या घरासमोर बांधुन ठेवलेला कुत्रा आमच्या अंगावर  सोडुन दिल्याने सदरच्या कुत्र्याने वहीणीच्या हाताचा चावा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला व माझी वहीणी सौ. प्रतिक्षा पांडुरंग कर्पे हीला दुखापत झालेली आहे.तेथे चिरे घेवुन बांधकाम करीत असलेले 'विनोद विजय जाधव, विजय. कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव यांनी हाताच्या थापटाने मारत धक्लाबुक्की करीत ठार मारण्याची धमकी दिली व विनोद विजय जाधव याने हातामध्ये तेथे पडलेला दगड घेवुन आपल्या डोकीमध्ये मारलेला आहे.आपल्याला दुखापत  झालेली असल्याने विनोद विजय जाधव, विजय कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव, विदया विजय जाधव  यांच्याविरुध्द  कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार दत्ताराम रामचंद्र कर्पे यांनी दिली आहे.