
कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात चंदुलाल पटेल हे संशयित आरोपी विरुद्ध तक्रार देण्यासाठी आले याचा राग मनात धरून त्यांना मोटरसायकलवरून पाडून, जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व तोंडावर दगडाने गंभीर दुखापत करून मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी क्र २ कय्यूम अब्दुलबारी खान (मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या राहणार कुडाळ) याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी २५,००० रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.