
सावंतवाडी : नगरपरिषद निवडणुका लवकरच होणार असून नगराध्यक्ष पदाच आरक्षण ओपन पडल्यास युतीतून लढण्यास मी इच्छुक आहे. युती न झाल्यास मंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबु कुडतरकर यांनी दिली. दरम्यान, मागील वेळी माझा थोडक्या मतांनी पराभव झाला. या पराभवान खचून न जाता मी काम सुरू ठेवलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत संधी मिळाली तर थेट नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक आहे असं बाबु कुडतरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, गजानन नाटेकर, खरेदी- विक्री संघ व्हा. चेअरमन राजन रेडकर, उप तालुकाप्रमुख विशाल बांदेकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.