
कणकवली : कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ उद्योजक संतोष राणे, नगरसेविका मेघा सावंत,दिलीप साटम, महेश सावंत, धीरज साटम आदी मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यसम्राट नगराध्यक्ष समिर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून टेंबवाडी आणि कांबळेगल्ली येथे कोट्यावधीचा निधी देऊन या प्रभागाचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले. तसेच या भागात विविध दर्जेदार विकास कामे सुरू असून या मध्ये या भागातील रस्ते, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गणपती साना येथे बारमाही धबधबा, काँक्रिट गटार, स्ट्रीट लाईट अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
त्याबद्दल त्यांचे या प्रभागातील जनतेच्या वतीने नगरसेविका मेघा सावंत यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सत्यवान राणे, विठ्ठल कांदलकर, अजित काणेकर, निखिल साटम, गणेश साळुंखे, बापु पांगम, प्रमोद सावंत, बाबू आर्डेकर, नागेश पारगावकर, गोट्या पारगावकर, व्यंकटेश सावंत, प्रथम सावंत, प्रथमेश परब, दिनेश मांडवकर, दिलीप राणे, मधुकर राणे, मारुती मेस्त्री, लाड, सावंत, बाळा पांगम, रवींद्र (आप्या)चव्हाण, पिंट्या सावंत, रुपेश साळुंखे, अमित मांडवकर, राजेश सावंत, रविकांत सातवसे, बागवे आदी उपस्थित होते.