
सावंतवाडी : सार्वजनिक नवरात्रोत्सवातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अस्मि मांजरेकर हिने आपला डंका कायम ठेवला आहे. बाजारपेठ मित्रमंडळ सावंतवाडीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत २५०० रू. पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. तर ओंकार नवरात्रोत्सव मंडल भटवाडी सावंतवाडीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत १००० रुपयाचे पारितोषिक पटकावले.
विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धेत खुल्या गटात तिने पारितोषिक पटकावत या स्पर्धेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. राजमाता जिजाऊची वेशभूषा साभिनय सादर केली होती. या यशाबद्दल अस्मीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.