अशोका विजयादशमी - धम्मचक्र प्रवर्तन दिन जामसंडेत उत्साहात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 25, 2023 15:21 PM
views 103  views

देवगड : देवगड येथील जामसंडे मुंबई गाव शाखेच्या वतीने सम्यक प्रबोधिनी अशोका विजयादशमी व ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जामसंडे बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.

सकाळच्या सत्रात धम्म ध्वजारोहण गाव शाखेचे उपाध्यक्ष सुरेश कृष्ण जाधव यांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या फोटोना पुष्पहार अर्पण करण्यात आला. पूजापाठ कार्यक्रम पंकज जाधव व राजेंद्र जाधव यांनी पार पाडला. त्यानंतर श्री. कांबळे, नगरसेविका मनीषा जामसंडेकर, उपाध्यक्ष सुरेश जाधव यांनी ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. एम. के. जामसंडेकर यांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीत धर्म परिवर्तन आणि धम्म प्रवर्तन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

सायंकाळच्या सत्रात पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपाध्यक्ष सुरेश कृष्णा जाधव, प्रियांका बबन जाधव, सचिव सपना संतोष जाधव, भांडारपाल प्राजक्ता प्रवीण जाधव, नगरसेविका मनीषा अनिल जामसंडेकर यांच्या हस्ते शालेय वस्तू देऊन करण्यात आला. दोन्ही सत्रातील कार्यक्रमाला महिला वर्ग, शालेय विद्यार्थी, आजी -माजी पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव पंकज जाधव यांनी केले.