अशोक कुडाळकर यांचं निधन

Edited by: भरत केसरकर
Published on: April 15, 2024 13:34 PM
views 800  views

कुडाळ : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील रहिवासी अशोक दत्ताराम कुडाळकर (वय 70) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. 

    बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे ते ज्येष्ठ सदस्य होते. उत्कृष्ट बॅकस्टेज कलाकार म्हणून कार्यरत असायचे. कुडाळ हायस्कूलचे ते माजी कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ येथील कुडाळेश्वर रूण्वाहिका सर्व्हिसचे मालक प्रसाद कुडाळकर यांचे ते वडील होत.