
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात प्रमुख वक्ता राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान यांनी आनंदमयी छात्रा सार्थक जीवन या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. भोसले नॉलेज सिटी येथे त्यांच व्याख्यान पार पडल.
ते म्हणाले, आपले विचार प्रकट करणे महत्त्वाच आहे. तसेच विद्यार्थी कोणते विचार करतात यांवर चर्चा होण देखील आवश्यक आहे. चांगलं शिक्षण, संस्कार विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. परिषदेच्या माध्यमातून ते होत आहे असं मत आशिष चौहान यांनी व्यक्त केले. यावेळी प्रांत अध्यक्ष प्रा.श्रीकांत दुदगीकर,प्रांत मंत्री राहुल राजोरिआ आदी उपस्थित होते.