उत्कृष्ट वाड्मय निर्मितीस आशीर्वाद पुरस्कार !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2024 06:16 AM
views 40  views

मुंबई : मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सगळ्या साहित्य प्रकारांना सन्मान चिन्ह व मानपत्र या स्वरूपात दिले जातात. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०२३ या १३ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री,प्रकाशक, वितरक व संबंधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचयासह  संस्थेच्या डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक,  'आशीर्वाद पुरस्कार ', फ्लॅट नं. ६०४, चंद्रदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ या पत्त्यावर  ३० मे २०२४ पर्यंत पाठवाव्यात.

पुरस्काराच्या विचारार्थ पाठवलेली पुस्तके कोणत्याही सबबीवर परत केली जात नाहीत व  निवड समितीचा पुरस्कारांचा निर्णय अंतिम असतो. यंदा आशीर्वाद  पुरस्कार प्रदान सोहळा दिवाळी २०२४ पूर्वी किंवा नंतर मुंबईत साजरा होईल . त्यावेळी पुरस्कार विजेत्यांना स्वखर्चाने सोहळ्यास उपस्थित राहावे लागेल.