
सावंतवाडी : आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चारच्या विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांनी दिंडीचे आयोजन केले होते. यामध्ये विविध संत तसेच विठ्ठल,रुक्मिणी आदी वेशभूषा साकारल्या होत्या. या दिंडीच्या त्या खास आकर्षण ठरल्या. विठुरायाच्या गजरात शाळा नं 4 ते विठ्ठल मंदिरापर्यंत या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .
नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या या शाळेचा हा नाविन्यपूर्ण स्तुत्य असा हा उपक्रम सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरला. भक्तीरसात न्हावून निघालेली ही दिंडी विठ्ठल दर्शनानंतर पुन्हा माघारी फिरली. यामध्ये शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष संतोष तळवणेकर, सदस्य,शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ, समस्त विद्यार्थी वर्ग तसेच मुख्याध्यापक पवार, तसेच धारगळकर ,पालव , घाडी, शिंदे, नाईक, बांदेकर, पवार, सावंत आदि शिक्षक वर्ग सहभागी झाला होता.