
सिंधुदुर्ग : परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी जागेवर तात्काळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी सचिन देसाई तसेच कोचरा,म्हापण, परूळे,चिपी,कुशेवाडा, भोगवे,मेढा,केळूस भागातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ दखल घेत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच लक्ष वेधल. यानंतर परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागान दिले होते. त्यानुसार या आरोग्य केंद्रास एम.बी.बी.एस डॉक्टर कृतीका जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच प्राथमिक आरोग्य केंद्र परूळेत स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन देसाई, श्री. म्हापणकर, निलेश तेली, उमाकांत परब यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.