
सावर्डे : चतुरंग प्रतिष्ठान मुंबई यांच्यावतीने कोकणातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेतील दहावीत शिकत असलेल्या आर्या नांदिवडेकर या विद्यार्थिनीला जाहीर झाला आहे. आर्या नांदिवडेकर,आर्या गमरे, रिया चव्हाण, स्नेहल चव्हाण व सेजल आदावडे या विद्यार्थ्यांची सातवी ते दहावी अखेरची विविध उपक्रमातील प्रमाणपत्रे, त्यांची गुणवत्ता, खेळ, जोपासलेले विविध छंद, विविध उपक्रमातील सहभाग व प्राविण्य इत्यादी बाबींचे मूल्यांकन करून व मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची पडताळणी करून आर्या नांदिवडेकरची 2024-25 च्या चतुरंगच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आलेली आहे.
आर्याने सातवी ते दहावी या आपल्या शालेय जीवनात तायक्वांदो,रांगोळी, बॉल बॅडमिंटन,वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा या विविध उपक्रमात सहभाग घेऊन तालुका जिल्हा विभागीय व राज्यस्तरापर्यंत यश प्राप्त केले आहे.
आर्याला 19 जानेवारी 2025 रोजी प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.गौरी शितोळे यांनी मार्गदर्शन केले होते. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम ,सचिव महेश महाडिक, सर्व पदाधिकारी, संचालक, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.